माझा
यापुर्वी एक हरि-हर गड ट्रेक झाला होता....... त्यामुळे त्याच वेळी मला ''कळसुबाई'' चे वेध लागले
होते. जिद्दी चे पुर्ण वर्षभरातील ट्रेक
ठरलेले असल्याने ते आम्हाला ठाऊक होते.
त्यामुळे जशी ट्रेकची तारीख जवळ येत होती, तस तशी आमची उत्कंठता वाढत होती.
अस
म्हणतात की, ''कळसुबाई'' म्हणजे "महाराष्ट्राच एव्हरेस्ट.."
"महाराष्ट्राचे सर्वोच्च शिखर" त्यामुळे उत्सुकता आणखीच शिगेला पोहोचली
होती. ''कळसुबाई'' शिखर म्हणजे ट्रेकर्स चा जीव की प्राण. ज्याला ट्रेकींगची
आवड आहे त्याने एकदातरी या शिखरावर अवश्य जाव अस शिखर......अहमदनगर जिल्ह्यातील
अकोले तालुक्यात हे ''कळसुबाई'' शिखर आहे. ''कळसुबाई'' समुद्र सपाटी पासुन ५४०० फूट म्हणजे सुमारे
१६४६ मीटर उंच आहे.
याच
वैशिष्ठ म्हणजे येथे वर्षातुन केव्हाही आणी कोणत्याही ऋतुत जा अगदी मे महिन्यात सुध्दा गेलात तरी तेथे
थंडी वाजते. शिखरावर उभे राहून निसर्ग सौंदर्याचा मनमुराद आनंद घ्यायचा असेल तर
...... " ''कळसुबाई'' "...... या ठिकाणाहून अनेक किल्यांच दर्शन होत.... पावसाळा असल्याने
मला मात्र हा अनुभव घेता आला नाही.
दि. 16 जुलै जाण्याची तारीख निश्चित
असल्यामुळे नेहमी प्रमाणे आदल्या दिवशी तयारीला सुरूवात. मागील हरीहर ट्रेकची चर्चा आमच्या कंपनीत काही
सहकार्यांकडे झाल्याने या वेळी माझ्या बरोबर आमच्याच कंपनीतील श्री.शक्ती नागवेकर
हा ट्रेकला यायला तयार झाला. त्याचा पण
प्रचंड उत्साह जाणवत होता. ट्रेकच्या आधी
माझ्याशी त्याचे ब-याच वेळा ट्रेक संदर्भात बोलण होत होत. मागील ट्रेकच्या वेळी मला सोबत कोणकोणते सामान घ्यायचेय
व कशातुन याचा चांगला अनुभव आल्याने माझी तरी या वेळी फसगत होणार नव्हती....
यावेळी प्रचंड पाउस पडत असल्याने व ''कळसुबाई'' म्हणजे पावसाच जणु
माहेरघरच असल्यामुळे तिथे रहाण्याचा कडेकोट बंदोबस्त करून निघणे आवश्यक होते. ''जिद्दीच्या'' धीरज बरोबर आदल्या
दिवशी बोलणे झाले होते. त्याने ट्रेकला
येणा-या सर्वांची मिटींग त्याच्या आँफिस मध्ये बोलावली होती. परंतु मला
तिथे जाणे माझ्या व्यस्त कामा मुळे शक्य झाले नाही. ठरल्या प्रमाणे थंडी,पाउस, याचा विचार करून
किमान 3 ड्रेस तरी आवश्यक होते........... मात्र हे निवडताना हलक्या प्रकारचे निवडायचे
मी ठरवले. थंडी साठी ब्लॅंकेट कंपल्सरी
घ्यायचे होते. रेनकोट, रात्रीचा ट्रेक ... त्यामुळे बॅटरी आवश्यक... इत्यादी ... गोष्टींची जमवाजमव .....करून सॅक भरली........
ट्रेकींगला
सकाळी 5.30 च्या दादर पॅसेंजरने पनवेल पर्यंत जायचे होते. ठरल्या प्रमाणे मला माझ्या मोठ्या मुलाने कारने
रेल्वे स्टेशनला सोडले.. परंतु 5.30 ची गाडी असल्याने सकाळी 4 वाजता उठायला
लागले. त्यामुळे झोप काही पुर्ण झालेली
नव्हती. रेल्वे स्टेशनला सर्वजण एकत्र
जमायचे ठरल्या नुसार 5 वाजेपर्यंत सर्व एकत्र जमले..... शक्ती नागवेकर डायरेक्ट
पनवेलला येणार होता.
आलेल्या ट्रेकर्स वर एकदा नजर फिरवली आणी मला मोठा प्रश्न पडला...... कारण आलेल्या
ट्रेकर्स मध्ये एक वयस्कर म्हणजे 60 ते 65 चे चव्हाण दांपत्य............. आता हे ''कळसुबाई'' चढुन जातील की नाही.... बर मध्येच काही त्यांना
त्रास झाल्यास सर्वांच्याच ट्रेकचा विचका होणार म्हणुन आमची आपसात कुजबुज सुरू
झाली......त्यांच्या बरोबर त्यांचा मुलगा व त्यांच्या मुलाची सख्खी मावशी
होती..... म्हणजे सर्व कुटुंब या ट्रेक मध्ये सहभागी झाले होत........ बर ''कळसुबाई'' हे अस शिखर आहे की तीथे काही प्रसंग उद्भवला तर
एखाद्याला उचलुन आणणे पण कठीण. धीरजने
यांना घेउन नकोती रिस्क घेतली आहे असे आम्ही मनातल्या मनात म्हणत होतो. परंतु याच 55 वर्षे ओलांडलेले कुटुंब आमच्या
सर्वांसाठी आणी जे ट्रेकींग करतात त्यांच्या साठी एक आदर्श कसे ठरले ते तुम्ही
पुढे वाचालच.........धीरजने रिझर्वेशन केल्याने इंजिन च्या मागचा दुसराच डबा
असल्याने इंजिनच्या आवाजाच्या त्रासाचा विचार सुरू झाला होता. गाडी वेळेवर सुटली ... गाडी सुटताना आमच्या
कोकणी माणसाच्या स्वभाव, भावना, विश्वास यामुळे धीरजने रेल्वे स्टेशनलाच अगरबत्ती
लावुन नारळ दिला.... काही पण म्हणा कोकणी माणुस काहीही असो नारळ दिल्या शिवाय
कोणत्याही कामाची सुरूवात करणार नाही..... माझा पण या गोष्टीला पाठिंबा असतो....
नेहमी प्रमाणे
सेल्फी सुरू..........आज सेल्फी पेक्षा फोटोचा कहर सुरू झाला. आज अक्षय खास फोटो ग्राफिसाठी आला होता. फोटोग्राफिचा नाद म्हणजे काय ते अक्षय कडे
बघीतल्यावर लक्षात येत.... तशी मला पण फोटोग्राफिची प्रचंड आवड..... जसा
फोटोग्राफिचा नाद असतो तसा फोटो काढून घेण्याचा पण नाद असतो..... "आमच्या भाषेत नाद खुळा"
.........
असा फोटो काढून घेण्यात मनिष या वेळी आघाडीवर होता.... आम्ही त्या दोघांना वेगळीच
नाव ठेवली मनिष ला अक्षयचे मॉडेल असे सर्व म्हणत होते. जिथे टेकायला मिळेल तिथे त्या दोघांची
फोटोग्राफी येईपर्यंत सुरू होती...........
सर्व जण
सकाळी लवकर उठुन आल्याने तासाभरातच पोटात कावळे ओरडायला लागले. झाल नेहमी प्रमाणे पहिली सुरूवात चैतन्यने
तळलेले गरे काढून खाण्यास केली.... चैतन्य आमचा नेहमीचा चेष्टा करण्यासाठी बकरा
असतो..... तो ग्रुप मध्ये नसेल तर चुकल्या चुकल्या सारख वाटेल..... मागच्या
ट्रेकच्या वर्णनात जरा त्याच जास्तच वर्ण झाल्याने या ट्रेक मध्ये त्याच्या गमती
जरा टाळत आहे..
ट्रेक म्हणा
,प्रवास म्हणा, किंवा पर्यटन म्हणा ... याचा प्रत्येकाला मनोसोक्त आनंद घेता आला
पाहीजे. दुपारी 1 वाजता आम्ही पनवेल स्टेशनला उतरलो. तीथुन आराम बसने ''कळसुबाई'' कडे प्रयाण करायचे होते.. टायमिंग ठरलेले..... बस स्टेशनच्या बाहेर तयार
असल्याने आम्ही लगेचच बस मध्ये विराजमान झालो.
परंतु दिलेल्या सुचना न पाळल्यास काय होते त्य़ाचा प्रत्यय या ठिकाणी आला. काल धीरजने आधीच दुपारच्या जेवणाचा डबा आणायला
सांगितला होता. परंतु मी सोडून कोणीच
आणलेला दिसला नाही. शक्ती नागवेकर या
ठिकाणी आम्हाला जॉइन झाला ...तो घरूनच जेउन आल्याने मी शक्ती आणी अक्षय जेवणाच्या
शोधात एका हॉटेल मध्ये जेवण केल.... अक्षयने घरून आंबोळी चटणी आणली होती. दोघांनीही
यथेच्छ ताव मारून आम्ही पुढच्या प्रवासासाठी गाडी मध्ये आलो. अनेकांनी डबे न आणल्याने सॅन्डविजची ऑर्डर
केल्याने गाडी सुटायला 1 तास उशीर झाला..... धीरज, अरविंद जरा नाराज झाले.... या 1
तास उशीराचा परिणाम पुढे भोगायला लागला... 3 वाजता आम्ही निघालो...... वाटेत कसारा
येथे चहा...... गाडीत गाण्यांचा कार्यक्रम मागील बाजुला सुरू होता..... दलमजल करत
आम्ही बारी गावात रात्री 8.30 वाजता पोहोचलो.....
बारी गावात
गेली 15 दिवस लाईट नाही..... साधा विचार करा आपल्याकडे 5 मिनीट लाईट गेली की आपण
सर्व MSEB च्या लोकांचा....त्यात लाईन मन पासुन ते अधीकारी,मंत्री.... कोण सुटत नाहीत.......
पुर्ण उध्दार करतो.... शिव्यांची लाखोली वाहतो.... विचार करा 15 दिवस लाईट
नाही........... कस जिवन जगत असतील ते लोक.....
लाइट नसल्याची
माहीती आम्हाला निघण्यापुर्वीच होती. मी
लाईट नसण्या बद्दल मनातल्या मनात देवाचे आभारच मानले.... कारण लाईट नसतानाचा तो
त्या रात्रीचा अनुभव परत शक्यतो येणे नाही..... गाडीतुन उतरताना बारी गाव
काळ्याकुट्ट अंधारात गडप झालेले.... गाडीतुन आम्ही जवळच्या मंदीरात सर्व एकत्र
थांबलो... मंदिरा पासुन आमच रहाण्याचा ठिकाण..... आमचा बेस कॅम्प जवळ जवळ 2 कि.मि.
होता. गाडीतुन उतरताना पाउस थांबला
होता. परतू धीरजने सर्वांना रेनकोटच घालुन
चालण्याची सुचना केली कारण येथे कोणत्याही क्षणी पावसाचे आगमन होते....
त्याप्रमाणे सर्वांनी रेनकोट घातले... मुख्यत: बॅगा न भिजण्याची काळजी घेणे आवश्यक
होते. मी ट्रेकींगची मोठी सॅक आणली
होती. माझ्या जिवाच्या मानाने तिचा आकार
मोठा असल्याने ति पाठीवर घेतल्यावर त्यावर रेनकोट म्हणजे एक बॅगेसाठी आवरणच ठरत
होत. त्या रेनकोट मधुन सुध्दा ती सॅक
खालुन खुप बाहेर आली होती...... आम्ही सर्वांनी काळोखातुन चालण्याला सुरवात केली.
येताना कंम्पल्सरी बॅटरी आणायला सांगण्यात आले होते परंतु इथे पण अनेक जणांनी जिद्दीच्या सुचना पाळल्या नसल्याने काहींची खुप पंचायत झाली. बॅटरी संख्या कमी असल्याने एकमेकांना रस्ता दाखवत त्या काळोख्या रात्रीतुन आम्ही दलमजल करत बेस कॅम्प कडे निघालो. पायाखाली प्रचंड़ चिखल..... अधुन मधुन बारीक पावसाच्या धारा..... तर
काही वेळा धबधब्यांचा मंजुळ आवाज. चालताना एकमेकांना सांभाळुन
घेत.... एक मेकाला आधार देत चालण्याची मजाच जणु और होती. यात ''जिद्दीच'' बळ एकवटलेल होत. मला पाठिवरची सॅक म्हणजे काळोख्या रात्रीचा जणु वेताळच विक्रमादीत्याच्या पाठीवर बसल्या सारख मला वाटत होत..... कारण त्या बॅगेच वजनच तितक होत.... हा दोन की. मी. चा चालण्याचा अनुभव खुप काही आम्हाला सांगुन गेला. ... एका बाजुला डोंगर तर एका बाजुला छोटी नदी... काही ठिकाणी छोट्या-छोट्या बांधांवरुन चालताना जणु आपण तारेवरूनच तोल सांभाळत कसरत करत चालत
असल्याचा भास होत होता. त्यात शहरातील माणसाला चिखलाची सवय नसते... मग तो इ...आ...शी....चचचच अस काहीतरी तोंडाने बडबडत नाक मुरडत त्यातुन चालतो. परंतु आमच्या ट्रेकर्स मध्ये मात्र तस नव्हत... प्रत्येकाने त्या चिखलातुन चालण्याचा सुध्दा एक प्रकारचा आनंद घेतला हे वैशिष्ट म्हणाव लागेल..... वाटेत मध्येच एका ठिकाणी छोटी नदी म्हणा किंवा आमच्या कोकणात याला ओढा किंवा प-या असे देखील म्हणतात, तो लागला.... प्रथम अरविंदने पाण्याच्या प्रवाहाची व खोलीची चाचपणी केली व
तो पुढे गेला. वेळ रात्रीची असल्याने यातुन जाणे आमच्या साठी तेवढ काही सोपे नव्हते. परंतु या ट्रेकर्सच्या मनात भितीचा कसलाच लवलेशही नव्हता. याला कारण प्रत्येकाच्या सुरक्षीततेची ''जिद्दी'' ग्रुपने घेतलेली काळजी आणी प्रत्येकाचा एकमेकाला असलेला खंबीर आधार हा होता. प्रत्येक जण एकमेकांचे हाथ धरून जात होते, काही एकमेकाला पास करत होते... नदिच्या आमच्या कडील बाजुला थोडासा उंचवटा होता तो उतरून आम्हाला नदी पार करावयाची होती. हा उंचवटा चिखलाने भरलेला असल्याने व उतारावर उतरून जायचे असल्याने प्रत्येकाचे पाय प्रचंड घसरत होते. परंतु जिद्दीच्या टिमच वैशिष्ट असे की, एकही व्यक्ती या चिखलात पाय घसरून पडली नाही. नदी पार करून आम्ही शेताच्या बांधावरून चालण्यास सुरूवात केली. हा शेतावरचा बांध दोन्ही बाजुला 3 ते 4 फुट खोल.... बांधाची रूंदी 1 ते दिड फुटाची....... यावरून एका वेळी एकच जण जाईल एवढीच जागा..... बांध पुर्ण चिखलाने भरलेला..... बांधावर असंख्य चढ उतार.... यातुन चालुन बांधाच्या शेवटच्या टोकाला पोहोचणे म्हणजे एक प्रकारचे दिव्यच होते. जरा जरी तोल गेला तर सरळ खाली शेतात.... त्यात बॅटरीचा प्रकाश कमी..... याच बांधावरून जाताना डाव्या बाजुला काळोखात डोंगरातुन पडणारा ''दुधाळ'' फेसाळणारा अंधुक धबधबा दिसत होता.... कसे बसे तो 100 फुट लांबीचा शेताचाबांध पार करून टोकाला पोहोचतो नाही तोच ....... पुढच दिव्य दत्त म्हणु उभे..... पुढे डोंगर चढाई...... बर पाठीवर वेताळाच ओझ कायम.....

यात काहींच्या
गमतीच झाल्या.... शक्ती नागवेकरने दोन बॅगा आणल्याने एक पाठीवर व एक सुटकेस टाईप
हातात.... त्यात अस अवघड अडचणीतुन चालायच..... असच काही... पराग केदारच होत होत...
त्याने मात्र पहीला ट्रेकचा अनुभव असुनही सॅक न आणता बॅग आणली होती. ती डोक्यावर दोन्ही हाताने उचलुन धरून चालताना त्याचीपण कसरत होत होती.....
डोंगराची चढणीची वाट .... वाट कसली फोटो पाहील्यावर तुमच्याही
लक्षात येईल..... पावसाच्या प्रचंड पाण्याने तयार झालेले नाले...... व या नाल्यातुनच जाणे म्हणजे आमची ती चालण्याची वाट..... या चढणीच्या व घसरणीच्या वाटेवरून चालताना खुप दमछाक झाली ..... प्रत्येक वेळी त्या विक्रम वेताळाची गोष्ट सारखी आठवत होती..... कारण पाठीवरील वजन आता मला जास्तच त्रासदायक वाटत होत..... परंतु जिद्द...... कायम होती. जाताना वाटेत शेवटी मी आणी शक्ती नागवेकर व पराग केदार असे तिघे होतो. वाटेतच एक मोठा खेकडा आम्हाला पायाखाली दिसला. त्याचा
फोटो काढायचा होता परंतु कॅमेरा,मोबाईल पावसामुळे पाठिवरील वेताळाच्या खिश्यात होता. आणी या वेताळाला मी काही वाटेत चिखलात उतरवु शकत नव्हतो. त्यामुळे हा क्षण राहुन गेला.... पुढे असे असंख्य खेकडे रात्री सर्वांना दिसले. मी विचार करित होतो की असे आमच्या कडे असते तर....... पुढच्या वर्षीला औषधाला पण शिल्लक ठेवले नसते लोकांनी......

आमच्या सोबत 9
वी इयत्तेत शिकणारी गोगटे कॉलेजच्या नाईक सरांची
मुलगी वेदांगी व तीची आई आली होती. या मुलीने यापुर्वीही जिद्दी सोबत ट्रेक केले होते. ती वॉटरफॉल रॅपलिंगलाही आमच्या सोबत होती. तिची आवड आणी जिद्द पाहून असेच प्रत्येकाच्या पालकांनी लहान पणापासुनच आपल्या मुलांना साहसी ठिकाणी पाठवणे गरजेचे आहे असे वाटते. यातुन भावी आयुष्यासाठी ती बरेच काही शिकणार हे नक्कीच.... तसेच रत्नागिरी रेल्वे स्टेशनला मला 62 वर्षाच्या चव्हाण कुटुंबा बद्दल पडलेला प्रश्न या ठिकाणी चालताना खोटा ठरला.... हे 62 वर्षाचे गृहस्थ आणी त्यांची 54-55 वर्षाची पत्नी व त्यांच्या पत्नीची बहीण, त्यांचा मुलगा आमच्या सर्वांच्या पुढे चालत
होते. त्यांचा मुलगा आपल्या कुटुंबाला, प्रत्येकाचा हात धरून नेत होता... हे कुटुंब सतत आमच्या पुढेच चालत होते.

कसे बसे
डोंगराची चढण चढत आम्ही आमच्या बेस कॅम्प जवळच्या देवळात आलो. हे ''कळसुबाई'' मंदिर
डोंगराच्या पायथ्या जवळच आहे........ मंदीर कौलारू..... आत भगव्या शेंदुराने पांघरलेली देवीची मुर्ती..... देउळ उघडे असल्याने सर्वांच्या बॅगा प्रथम मंदिरात ठेउन आमच्या रहाण्याच्या ठिकाणी आम्ही जेवणासाठी गेलो. माझ्या पाठीवरील तो वेताळ त्या देवळात उतरल्यावर मला परत त्या विक्रमाची आठवण झाली....... आमचा बेसकॅम्प देवळा पासुन 100 ते 200 पाउलांवर असणा-या घरात होता. परंतू तेथेही जाताना छोटे-मोठे उतार चढण पार करावी लागली. आम्ही 41 जण........ आणी 3 ते चार खोल्यांच ते घर....... बाहेर पत्र्याची शेड..... आत मातीची जमीन.... मातीच्या भिंती...... एका बाजुला स्वयंपाक घर..... मला माझ्या गावाकडच्या घराची आठवण झाली.....घरात जाण्यापुर्वी चिखलाने माखलेले आमचे पाय जणु कोणीतही मुलतानी मातीचा लेप लावल्या सारखे दिसत होते.... ते धुण्यासाठी पाण्याची गरज होती. आता प्रत्येकाला पाणी लागणार..... याचा विचार करता, आता एवढ्या लोकांनी पाय कुठे धुवायचे असा मला प्रश्न पडला होता. परंतु जेव्हा त्या घराजवळ आम्ही गेल्यावर मला खुप आनंद झाला. घरा शेजारी एका ठिकाळी काळ्या कातळावरून एका पाईप मधुन अखंड पाणी खाली पडत होते..... जणु विहिरीवर पंप बसवल्या प्रमाणे..... पाणी अत्यंत स्वच्छ...... काचे प्रमाणे.... तेवढेच थंड देखील..... या ठिकाणी कुठलेही प्रदुषण नाही.... कोणताही गोंगाट नाही...आवाज फक्त पाउस-वा-याचा,धबधब्यांचा.....असा निसर्गाचे वरदान लाभलेले हे बारी गाव.....

सर्वांनी हात
पाय धुवुन आम्ही जेवणासाठी घरात स्थानापन्न झालो.
एक लांब लचक पडवी... त्यामध्ये कंदील व एक रॉकेलचा दिवा..... आहा काय ते
दृष्य..... अशा गोष्टींची मी आतुरतेने वाट बघत होतो.... ( म्हणुनच मी या वर्णनात
मागे प्रथम म्हटले आहे की, लाईट नसल्याचे मला समजल्यावर मी देवाचे आभारच मानले )...... जेवणाला भाक-या देण्याचे आधीच सांगितले
होते. परंतु 15 दिवस लाईट नसल्याने दळण
दळुन न मिळाल्याने भाक-या थोड्याच होत्या.
परंतु माझ्या वाट्याला मात्र आली....... जेवणात पातळ भाजी....... आमटी.....
भात.... आणी आंब्याच लोणच.... आहाहा.... त्या जेवणाची चवच न्यारी. पातळ भाजीला जी चव होती ती लाखो रूपये खर्चुन फाईव्हस्टार
हॉटेल मध्ये जाउन जेवलो तरी येणार नाही अशी.
त्यांच्याकडे आंब्याच लोणच घालण्याची अनोखी पध्दत. लोणच्याला नावाला सुध्दा
तेल नाही.... संपुर्ण सुक्या फोडी.... बाटीसह तुकडे करून ते उन्हात वाळवायचे आणी
मिठ,मसाला,हळदीत घालुन खारवुन वापरायचे.
या सर्व जेवणाची चव अजुनही सर्वांच्याच जिभेवर असणार यात शंकाच नाही.
या जेवण्याच्या खोलीत पिठ दळायच दगडी जात ठेवलेल होत. त्यावर तो रॉकेलचा दिवा ठेवलेला असल्याने ते दृष्य ज्याला फोटोग्राफिची आवड आहे तो टिपल्याशीवाय कसा रहाणार... त्यामुळे त्या जात्याच फोटोसेशन सुरू झाल....
जेवणानंतर
मुलींसाठी स्वतंत्र खोली देण्यात आली.
पुरूष मंडळींनी त्या पडवीतच झोपायच ठरवल परंतु जागा कमी पडल्याने आम्ही
देवळात जाउन झोपण्याचा विचार करत होतो.
परंतु होय-नाही म्हणताना त्याच घरातील आतल्या देव खोलीत आम्ही एकाला एक चिकटून
8 ते 9 जण झोपायच ठरवल. देवळात ठेवलेल्या
सर्वांच्या बॅगा परत घेउन याव्या लागल्या.....
आता आमच्या पैकी काहींना टेंन्शन होत ते घोरणा-या लोकांच..... मग चाचपणी
सुरू झाली..... घोरणा-यांनी पडवीत झोपायच आणी आम्ही आतल्या देव खोलीत... मध्ये
फक्त दरवाजा.... त्याने काय तो आवाज लपणार थोडाच..... आमच्या खोलीत कोणी घोरणारे
नाहीत म्हणुन आम्हाला चांगली झोप लागेल अस वाटल होत परंतु झोपल्या नंतर या
गोष्टींचा आमचा भ्रमनिरास झाला..... झोपल्यावर भुजंगाने बिळातुन फणा काढुन आपले
रौद्र रूप दाखवायला सुरवात केली..... भुजंग म्हटल्यावर तुम्ही घाबरला असणार
ना........ पण तसा भुजंग नाही हो.... भुजंग नावाचा आमचा ग्रुप मेंबर.... आधी घोरत नाही
म्हणाला.... झोपल्यावर जोराने घोरू लागला... म्हणुन म्हटल......... तो काही केल्या
रात्रभर बिळात काही परत गेला नाही.... अशा गमती जमती देखील घडत होत्या..... आम्ही
ज्यांच्या कडे उतरलो होतो त्यांच आडनाव खाडे होत.
यांनी कसलाही विचार न करता आपल संपुर्ण घरच आमच्या हवाली केल होत. आम्ही
10.30 वाजता साधारण पणे अंथरूणावर विसावलो.
या रात्रीच आणखी एक वैशिष्ट म्हणजे येथे एकही डास नव्हता......
सकाळी
काळोखातुनच चढाईला सुरवात करायची असल्याने सकाळचे उठायचे गजर मोबाईल मध्ये लावले
होते. सकाळी साधारण 3.30 वा. धीरजने
एके-काला उठवायला सुरवात केली... आंघोळ वगैरे काही करावयाचे नसल्याने प्रथम ब्रश
आणी प्रात:विधीचा कार्यक्रम काहींनी उरकुन घेतला.
सकाळच्या नाष्ट्याची सोय करण्यात आली होती. एवढ्या सकाळी नाष्टा म्हणजे माझ्यासाठी
धर्मसंकट. परंतु नाईलाज असल्याने मी थोडेसे कांदे पोहे खाउन घेतले. बरोबर सकाळी 5.30 वाजता काळोखातुन आम्ही ''कळसुबाई'' कडे प्रयाण केले.
मुंबई वरून पहाटे 10-15 जणांचा एक ग्रुप येवुन
आमच्या जवळच उभा होता. त्यांना पुढे
जाण्याचा रस्ता सुचत नव्हता. आम्ही घरातुन
बाहेर पडल्यावर काळोख असल्याने आमच्या ग्रुप मधील एकाने त्यांचा ग्रुप जॉइन करून
त्यांच्या सोबत काळोखात फोटो देखील काढले.
परंतु कॅमेरॅच्या फ्लॅशच्या प्रकाशात त्याच्या लक्षात आल की हा आपला ग्रुप
नाही तसा तो पळत पुन्हा आमच्या ग्रुप मध्ये आला.... आता मुंबईहून आलेला ग्रुप
जेव्हा काढलेले फोटो पहातील तेव्हा त्यांना हा प्रश्न सारखा सतावेल की ह्या
फोटोतला हा नेमका कोण.... हा तर काही आमच्या बरोबर नव्हता..... काही भुताटकी तर
नाही ना.....( रात्रीस खेळ चाले... सिरीयल आठवेल त्यांना )
नंतर धीरजने सर्व मेंबर मोजुन सर्व आले आहेत याची खात्री केली. आमचे 4 ग्रुप पाडले. जोपर्यंत दिसायला लागत नाही तो पर्यंत कोणीही ग्रुप सोडायचा नाही अशा सक्त सुचना होत्या. ग्रुप मेंबरनी पण त्या नीट पाळल्या.... आणी असा आमचा काळोखातुन बॅटरीच्या प्रकाशात ''कळसुबाई'' प्रवास सुरू झाला.
शिखरावर
जाण्यासाठी एकुण चार लोखंडी शिड्या 2007 च्या दरम्यान लावण्यात आल्या आहेत. पुर्वी या शिड्या नव्हत्या त्यावेळी ट्रेकर्स
ना climbing करत
जावे लागत असावे अस एकंदरीत त्या ठिकाणची परिस्थिती पहाता वाटते.
आम्ही बॅटरीच्या प्रकाशात पावसाळ्यातील चिखलाची अतीशय अशा अवघड वाटेने एकमेकांना सहारा देत चालत होतो. काळोख असल्याने नेमक किती चाललो ते समजुन येत नव्हत. पण तो उत्साह खुप दांडगा होता. चालण्यासाठी वाट नव्हतीच फक्त चिखलच..चिखल... पावसाने मात्र थोडी विश्रांती घेतली होती. अधुन मधुन लग्नातील अक्षता टाकल्या प्रमाणे तो आमच्यावर पाणी शिंपडत होता. तासाभराने अंधुक अंधुक दिसायला सुरूवात झाली ..... पुर्ण दिसायला लागल्यावर आम्ही जणु स्वर्गाच चालत आहोत असा भास होत होता. चारही बाजुला ढगच ढग...... त्यात मध्येच
पाउस.... थंड वारा..... हिरवेगार जंगल..... उंचावरून अजुन बारी गाव आम्हाला दिसत नव्हते. जाताना काही दगडी पाय-या चढून जाव्या लागतात. पाय-या चढताना खुप दमछाक होते. आता चांगल दिसायला लागल होत..... आमच्या चहू बाजुला निसर्गाने धुक्याची चादर पांघरलेली होती....दवाचे प्रत्येक थेंब मोजता येतील असे गवतावर आरूढ झाले होते. पावसाने चिंब भिजलेली झाडे...... त्यातुनच वाट काढत ''कळसुबाई'' शिखराकडे जाणारे ते पांढरेशुभ्र ढग.... या ढगांना वारा जणू जबरदस्तीने ढकलत शिखरापर्यंत नेत होता. ..... यातच आम्ही फोटो काढत होतो.... मध्येच पाऊस येत असल्याने, मनात असुनही मनसोक्त फोटो नाही काढता आले...... परंतु अक्षय मात्र कायम त्याच्या कॅमे-याच्या लेन्सवर पडलेले पाणी पुसुन - पुसुन फोटो काढत होता. त्याने मात्र शेवट पर्यंत कॅमेरा बंद केला नाही.....
आम्हाला साधारण दिड ते दोन तासाने पहिली लोखंडी शिडी लागली. शिडीचे वर्णन करायचे झाल्यास अत्यंत अरूंद...... एका वेळी एकच व्यक्ती निट चढू शकेल, तिच्या दोन्ही बाजुला लोखंडी पाईप लावुन पाय ठेवण्यासाठी 3 इंचाचा लोखंडी अॅंगल वापरून तयार केलेली पायरी.... या पायरीवर पाय ठेवला की पायाचा मधला भागच त्यावर रहायचा..... दोन पाय-यांमध्ये साधारणत: अर्धा ते एक फुटाच अंतर.... मध्ये पोकळ भाग...... चुकुन दुस-या पायरीवर पाय ठेवताना पाय चुकला तर दोन पाय-यांच्या मधील पोकळ भागात गेलाच म्हणुन समजा..... आणी असा पाय चुकुन गेला तर त्याला उचलुन नेण्याशीवाय कोणताही पर्यांय रहाणार नाही एवढी त्या पाय-यांची भीती..

....
या शिड्या चढताना देखील जिद्दीच्या ग्रुप कडून
खुप काळजी घेतली गेली.... आधी एक मेंबर पुढे शिडीची अवस्था कशी आहे ते चेक करून, मग एक मेंबर प्रत्येकाला सुचना देउन पुढे पास
करायचा.... कोणतीही गडबड नाही की, गोंधळ
नाही....सगळ कस सिस्टिमेटीक.... एक सुंदर प्लॅनिंग.....
शिडीच्या वरच्या टोकाकडे पाहील......टोक
आकाशात लुप्त झालेले.....जणु ही शिडी आपणाला स्वर्गात तर घेउन जात नाही ना अस
वाटाव..... खरोखरच त्या दृष्याचे शब्दात वर्णन करणे कठीण. पहिल्या शिडीवर चव्हाण
कुटुंब एकत्र शिडी चढत होते. मी त्यांचे
फोटो काढून घेतले.... एक आदर्श कुटुंब.... तुम्हीच विचार करा ट्रेकिंग हा सध्या
मौज मजा करण्याचा भाग आहे... परंतु जिद्दी ग्रुपने या चव्हाण कुटुंबाला आपल्यात
सामावुन हा काही तरूणांचाच मक्ता नाही तर ती एक सामाजीक बांधीलकी देखील आहे हे
सिध्द केल. चव्हाण कुटुंबातील
त्यांच्या मुलाच कौतुक कराव तेवढ कमीच आहे. एक मुलगा........ मनात आणल असत तर तो एकटाच मजा आणी आनंद लुटायला या ट्रेक मध्ये सहभागी झाला असता. परंतु त्याने तस न करता श्रावणबाळासारख आपल्या आई वडीलांना पण या निसर्ग सौंदर्याचा आनंद घेउ दे या उद्देशाने त्यांना देखील त्याने त्यात सामावुन घेतल. पुढे येणा-या अडचणींची त्याला किंवा जिद्दीच्या मेंबरना कल्पना नव्हती अस नाही. परंतु उतार वयात झुकलेल्या व्यक्तींना अशी निसर्गाच्या सौंदर्यांने भरलेली ठिकाण पहाणे फार दुर्मिळ. परंतु चव्हाण कुटुंबाच्या मुलाच्या व त्यांच्या इच्छाशक्तीपुढे व जिद्दीच्या चिकाटी पुढे त्या ''कळसुबाई'' शिखराला देखील नतमस्तक व्हाव लागल... त्यांच्या साठी आपल्या स्वर्गाच दारच जणू तीन उघडल....... मी इथे आवर्जुन सांगेन त्यांच्या मुलाने आपल्या आई वडीलांचा हात व साथ शिखर चढुन परत येई पर्यंत सोडला नाही व जिद्दीच्या मेंबरनीही त्यांची साथ सोडली नाही त्या दोघांनाही माझा सलाम.....

शिडी चढुन परत आम्ही चढाईच्या दुस-या टप्यात
आलो.... थोड अंतर पार केल की पुन्हा शिडी..... आता सकाळचे 7 वाजले होते. आम्ही जवळ
जवळ निम्याहून अंतर पार केल होत. आता
पुढील चढाईला सुरवात केली.... जाताना गावातील व्यक्तींनी इथे काही चहाच्या टप-या
सुरू केल्या आहेत.... त्यांनी भजी चहा करायला सुरवात केली होती.......याचा आस्वाद
येताना घ्यायचा अस
सर्वांनी ठरवल....... दुसरी शिडी पार करून आल्यावर आपण स्वर्गात पोहोचण्याच्या मुख्य दरवाज्या जवळ पोहोचल्याचा भास होतो..... आता स्वर्गातील सौंदर्य केव्हा पाहीन असे झाल होत.... आजुबाजुला पाण्याचे धबधबे दिसत होते..... एका बाजुला उंचच्या उंच कडे .... तर एका बाजुला बारी गाव दिसत होत... परंतु बारी गावाचे पुर्ण दर्शन होत नव्हत..... पावसाचा मारा सुरू होता.... आता खरी थंडी वाजायला सुरूवात झाली होती....

आता आम्ही निसर्ग सौंदर्याने नटलेल्या त्या
तिस-या टप्यातील शेवटच्या शिडी जवळ
पोहोचलो..... शिडी जवळ जवळ 80 अंश कोनात उभी होती.......शिडी पार केली की स्वर्गांत पोहोचण्याचा आनंद आम्हाला घेता येणार होता...... सहज शिडीच्या शेवटच्या टोकाकडे पाहील....... वर निळ भोर आकाश ढगांच्यामधुन दिसत होत..... वा-यामुळे आमच्या जवळुन इकडून तिकडे पळणारे ढग जणु पकाडा - पकडीचा खेळच करत होते. आम्हाला पण आपल्या खेळात सामाहून घेण्यास जणु ते आसुसले होते....... शिडीच्या दोन्ही बाजुला असणा-या सरळ उंच
काळ्या दगडाच्या नैसर्गीक भिंतीनी जणु स्वर्गमहालाला चारी बाजुंनी वेढल होत..... त्या काळ्या दगडांमधुन उगवलेली सुंदर हिरवळ...... मधुनच वाहणारे पाणी ......पाहुन डोळ्याचे पारणेच फिटले...... शिडीच्या एक-एक पाय-या चढून मी वर जस जसा जात होतो..... तस तस माझ्या ह्रदयाचे ठोके वाढत होते ..... आता मी महाराष्ट्रातील सर्वात उंच शिखरावर पाय ठेवणार होतो.... तो शेवटचा टप्पा कधी पार करतोय अस मला झाल होत...... शेवटची
पायरी चढुन गेल्यावर फक्त एक झेंडा दिसला...... तो देवळा जवळचा झेंडा होता.... फक्त 10 ते 15 फुटच आणखी चढायच होत ..... लगेचच मी या उंच शिखराच्या टोकावर पोहोचलो........ सकाळचे 8.30 वाजले होते..... माझा आनंद गगनात मावेनासा झाला..... चारही बाजुला मोकळे आकाश.... इकडून तिकडे धावणारे ढग....... बारीक पाउस........... थंड वारा....... टोकावरून खाली पाहील्यावर.... ढगांच्या लपाछपीतुन दिसणारे बारी गाव...... आजुबाजुचे उंचच्या उंच कडे...... कड्यातुन वाहणारे दुधाळ धबधबे....... पुर्ण डोंगर कडा या छोट्या-छोट्या धबधब्यांनी व्यापुन टाकलेले...... या शेवटच्या टोकावर साधारणत: 100 माणसे रहातील अशी जागा........ ''कळसुबाई'' च छोटस देऊळ ..... देवळासमोर एक रोवलेला त्रिशुळ आणी पोलाला बांधलेल्या अनेक घंटा........ या घंटेच्या पोलाला बांधलेला एक मोठा लोखंडी साखळदंड होता. हा साखळदंड कड्यावरून खाली दरीत सोड्यात आला आहे. या लोखंडी साळदंडाने घासुन घासुन कड्याला 5 ते 6 फुटाची साखळदंडाच्या आकाराची एक उभी फट पडली आहे. असे म्हणतात की, 1860 साली आर्चडीकन गेल या इंग्रजाने रात्रीच्या वेळेस शिखरावर चढाई केली. पहाटेच्या वेळी शिखरावरून सुर्योदय पाहिल्याने प्रभावित झालेल्या गेलने कळसुबाई शिखराला ''दि किंग ऑफ द डेक्कन हिल्स'' असे म्हटले. आणी याच इंग्रजांनी चढाई साठी हा साखळदंड येथे बांधला..... साखळदंडाचे वजन साधारण 500 ते 700 किलोच्या दरम्यान असावे.

सगळ्यांनी
येथील दृष्ये डोळ्यात साठवण्यास सुरूवात केली.
फोटो सेशन झाले.... प्रत्येक जण कड्याच्या सर्व बाजुंना असणारे निसर्ग सौंदर्य
डोळेभरून पाहा होते.... क्षणात वरून बारी गाव दिसत होते तर डोळ्याची पापणी लवतेय
ना लवते तोपर्यंत ढगात ते बारी गाव अदृष्य होत होते..... क्षणात पाउस....क्षणात
वारा..... अक्षरश:
वेड लावणारा निसर्गाचा नजराणा.....टोकावर प्रवेशाची बाजु सोडल्यास इतर सर्व
बाजुंनी सुरक्षीततेच्या दृष्टीने लोखंडी रेलिंग घातलेले आहे.... इंग्रजांनी ती
बसवलेली लोखंडी साखळी..... आपल्या लोकांनी ते चारी बाजुला घातलेले लोखंडी
रेलींग...... कस एवढ सामान त्यांनी इतक्या वर आणल असेल.... त्यांच्या या शौर्यांला
खरोखरच सलाम....
मागील बाजुला
कोकण कडा आहे .... येथुन हौशी ट्रेकर रॅपलिंग करतात ...... कडा खुप सुंदर व खोल
आहे.... दाट ढगांमुळे त्याचे दर्शन आम्हाला झाले नाही......
नंतर आम्ही
येताना आणलेली बिस्कीटे खाऊन जमेल तशी पोटपुजा केली. नंतर ''कळसुबाई'' देवीच्या
मंदिरासमोर पुर्ण ताल सुरात आरत्या केल्या..... शिवरायांच्या नावाचा जयघोष
केला...... आणी तासाभराने परतीचा प्रवास सुरू झाला....
परतीचा प्रवास
माझ्या साठी फार कष्टदायक ठरला. मी येताना
रेनकोट घातला होता परंतु चढाईच्या तिस-या टप्प्यात मी रेनकोट ची पॅन्ट काढून टाकली
परंतु ''कळसुबाई'' टोकावर जाई पर्यंत पावसाने पॅंन्ट पुर्ण भिजून
गेली... त्यात थंडी.... मी जेमतेम उतरताना पहिली शिडी उतरलो आणी अचानक माझ्या
दोन्ही पायांचे गुढगे पुर्ण लॉक झाले. मला एकही पाउल पुढे टाकवेना..... बाका
प्रसंग..... माझे गुडघ्यात पाय फोल्डच व्हायला तयार नाहीत. प्रत्येक पाउल उतरताना फोल्ड केल्याशीवाय कस
उतरणार.... फार हैराण झालो..... कस-बस पाय ताटच्या ताटच ठेऊन निम्मे अंतर पार
केले.... उतरताना अधुन मधुन ढग जात येत असल्याने हे सुंदर दृष्य पाहुन मला माझ्या पायांच्या
वेदना विसरण्याला मदत होत होती...... आमचा ग्रुप फार पुढे निघुन गेला होता....
आम्ही 5-6 जणच मागे उरलो होतो..... त्यातच भर म्हणुन आणखी दोन मुलींच्या पायाना
क्रॅम्प आला.... त्यातील एकीला तर एकही पाय पुढे टाकवत नव्हता...... जवळ-जवळ उचलुन
न्यायची वेळ...... आता काय करणार ....... उचलुन नेणे ही अशक्य कोटीतील गोष्ट
होती.....मग धीरज...अनुज आणि त्यांचा एक ग्रुप मेंबर व आम्ही न चालता येणारे तिघ
असा शेवटचा ग्रुप... मग जिद्दीच्या ग्रुप मेंबरचा अनुभव येथे कामी आला...... एकाने
दोघींच्याही पायाना मॉलिश केल.... तो मॉलिशचा प्रकार आठवला की आजही माझ्या आणी हा
ब्लॉग वाचताना ज्यांच्या पायांना मॉलिश केल त्यांच्या अंगावर शहारे नक्कीच
येतील.... ते वेदना देणारे मॉलिश मी बघत होतो..... निकत मुल्ला च्या पायांना मॉलिश
करताना, अक्षरश:ती
प्रचंड ओरडत होती....
मम्मी...................................................................
मम्मी म्हणुन तीन आरोळी ठोकली की, ती पुर्ण कड्यात जणु तीचा इको आवाज यावा इतकी जोराने.... कदाचीत ती मनात तेवढ्याच जोराने मॉलिश करणा-याला शिव्यापण देत असावी...... इतक जोराच मॉलिश........ पण काय चमत्कार त्या मॉलिश मध्ये ......... त्या दोघीही थोड्या वेळाने वेवस्थित चालत पुढे गेलेल्या ग्रुपला जॉइन पण झाल्या....... मी निकत दिसली की....... मम्मी................ अस ओरडून तीला चिडवत होतो....... ती वयाने खुप लहान..... माझ्या दोन नंबर मुला एवढी त्यामुळे मला तिची मनोमनी काळजी वाटत होती..........परंतु माझ्या पायावर मात्र कोणताच उपाय नव्हता...... अनुजने आणलेला स्प्रे गुढग्यांवर मारून झाला ..............काही उपयोग नाही....... थोड्या वेळाने तो पण संपला....... मग धीरजने त्याच्याकडील लिक्विड औषध आपल्या हाताने चोळुन लावले.... त्यावेळी आपला एक लहान भाऊच आपली सेवा करत असल्याचा भास झाला..... खरोखरच जिद्दीच्या सर्वच मेंबर बरोबर एवढी भावनीक अॅटॅचमेंट झाली होती..... अनुज,धीरज,राकेश .... माझ्या बरोबर शेवट पर्यंत होते.... बाकीचे मेंबर केव्हाच पोहोचले होते. .... वॉकी टॉकी वरून सार कळवल जात होत..... शेवटचा टप्पा उतरताना मला पुर्ण ब्रम्हांड आठवल.... प्रचंड वेदना होत होत्या ...... परंतु मनात पुर्ण जिद्द......शेवटी मला इतरांपेक्षा उतरायला 1 ते दिड तास जादा लागला...... जढण्यापेक्षा उतरताना अनेकांची जास्त दमछाक झाली कारण...... प्रचंड चिखल....... प्रत्येक पाय पुर्ण विचार करून ठेवावा लागत होता..... आम्ही उतरताना पहिल्याच शिडी जवळ ट्राफिक जाम झाल होत..... आम्ही उतरताना मुंबई वरून 800 जणांचा ग्रुप ''कळसुबाई'' चढाई करत होता..... जेमतेम एक-एक माणुस जाईल अशी जागा आणी इतके जण.... त्याच्या चालण्याने पुर्ण डोंगरातील चालण्याची वाट आणखीनच चिखलमय व प्रचंड घसरणीची झाली होती..... या ट्रेक मध्ये, मुबईवरून आलेल्या ट्रेकर्स मधील एक 5 वर्षाची मुलगी होती. तीने 3 ते 5 या तिच्या वयात एकुण 15 ट्रेक पुर्ण केले होते..... आमच्या साठी ती आदर्श होती..... तीचा फोटो देखील काढण्यात आला...

.
अशी अवघड वाट उतरून आम्ही बेस कॅम्पवर दुपारी
1 वाजता पोहोचलो..... नंतर जेवण... बेस कॅम्पवर जेवण झाल्यावर जिद्दीच एक सेशन
झाल... माझे गुढगे प्रचंड वेदना देत असल्याने मी औषध लावुन निवांत झोपलो
होतो... आणी 3 वा. परतीचा प्रवास सुरू...... परत काल रात्रीचा बॅग रूपी वेताळ
माझ्या पाठीवर...... मी सर्वांच्या आधी निघालो..... कसेबसे डोंगर नदी पार करून
गाडी जवळ पोहोचलो.... ती रात्री पार केलेली वाट दिवसा उजेडात पहाताना आमच आम्हालाच
आश्चर्य वाटत होत........ गाडी जवळ सर्व
जमल्यावर एक मोठा प्रश्न निर्माण झाला .... आमच्या गाडीच्या दोन्ही बाजुला घासुन
दोन कार लावण्यात आल्या होत्या त्यामुळे आमची गाडी काढणे अशक्यच होते. बर गाडी लावुन ट्रेकींगला गेलेले कधी येणार
याचा पत्ताच नव्हता..... आता बहुतेक सर्व वेळ वाया जाणार अस सर्वांना वाटत होत.....
परतीच्या प्रवासाची तिकीटे आधीच काढलेली असल्याने ...... सर्वांनाच चिंता वाटत
होती...... एवढ्यात एक जण बोलला गाडी उचलुन बाजुला ठेउया........ काय म्हणाल या
जिद्दीला...... बर ही जिद्दीची मुल....क्षणात गाडी उचलुन बाजुला.......... याला
म्हणतात जिद्द...
आम्ही महाराष्ट्राच उंच शिखर पादाक्रांत
केल्याचा सार्थ अभिमान उराशी बाळगुन आम्ही परतीच्या प्रवासाला सुरूवात केली...
हे सर्व पार पडल ते "जिद्दी" मुळे....
त्यामुळे "JIDDI Moutaineering Association" च्या सर्व
मेंबरना मनापासुन धन्यवाद !